अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :- जिल्ह्यासह देशभर चर्चेचा विषय बनलेले पारनेर तालुक्यातील भाळवणी येथील कोविड सेंटर येथे विविध ठिकाणाहून रुग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत.
यातच असेच एका कोरोनाबाधित आजोबांनी परराज्यातून येत या कोविड सेंटरमध्ये उपचार घेत कोरोनावर मात केली आहे.
आंबाजी विठोबा कारंडे (वय 65, रा. शिराढोण, तालुका परचड, कर्नाटक) असे या आजोबांचे नाव असून भारावलेले आजोबा म्हणाले वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या परिश्रमामुळे व आमदार लंके यांच्या मानसिक आधारामुळे मी बरा झालो…
भाळवणीतील कोविड सेंटरमध्ये राज्याबरोबरच आता परराज्यातील रुग्णांनाही आ. नीलेश लंके यांचा आधार वाटू लागला आहे. येथे आजवर हजारो रुग्ण कोरोनावर मात करून घरी पर्ल आहे. याबाबतची माहिती मिळाल्याने मी भाळवणी येथे दाखल झालो.
अखेर 12 दिवसांच्या उपचारनंतर आजोबा कोरोनामुक्त झाले आहे. अतिशय गंभीर स्थिती असलेल्या या आजोबाना या कोविड सेंटर मध्ये दाखल करून घेण्यात आले होते.
डॉक्टरांच्या चमूने उपचार सुरू केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती सुधारू लागली. आठ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या शरीरातील प्राणवायूची पातळी 99 वर जावून सामान्य झाली.
साक्षात मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडल्याची भावना व्यक्त करताना आंबाजी यांनी आ. लंके यांच्यासमोर हात जोडून आश्रूंना वाट मोकळी करून दिली. 65 वर्षीय वृद्धाने व्यक्त केलेली ही कृतज्ञता पाहून आ. लंके यांनाही गहिवरून आले.