तो रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- श्रीरामपूर-निमगाव खैरी रस्त्यावर आत्तापर्यंत अनेक अपघात झाले असून अनेक तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता तरी सार्वजनिक बांधकाम खात्याने आणखी बळी जाण्याची वाट न पाहता या रस्त्यावर दिशा फलक लावावीत.

अशी मागणी केली जाऊ लागली आहे. श्रीरामपूरहून निमगाव खैरी मार्गे जाणारा रस्ता हा पुढे कोपरगावला नगर-मनमाड महामार्गाला मिळतो. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते.

या रस्त्यावर निमगाव खैरी येथे न्यू इंग्लिश स्कूल असल्यामुळे त्याठिकाणी विद्यार्थ्यांची वर्दळ असते. त्याठिकाणी गतिरोधक नसल्याने वाहनचालक वेगाने ये-जा करतात तसेच निमगाव येथे बस स्टॉप असल्याने तेथेही प्रवाशांची व ग्रामस्थांची मोठी वर्दळ असते परंतु त्याठिकाणी गतिरोधक नसल्याने अपघाताचे प्रमाण मोठे आहे.

साबळे वस्ती, तीन चारी, होले सर्विस स्टेशन, काळे वस्ती, चितळी चौफुला या ठिकाणी मोठे वळण आहे. वाहनचालकाला वळणाचा अंदाज न आल्याने मोठ्या प्रमाणात अपघात घडले आहेत. त्यात अनेक निष्पाप लोकांचा जीव गेला आहे. एकाच आठवड्यामध्ये जवळजवळ चार ते पाच तरुणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

आतातरी सार्वजनिक बांधकाम विभागाने या अपघातांची दखल घेऊन या रस्त्यावर रिफ्लेक्टर आणि गतिरोधक बसवावेत, अशी मागणी निमगाव खैरी, गोंधवणी, गोंडेगाव, आदी गावांतील ग्रामस्थांसह वाहनचालकांनी केली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24