अहमदनगर Live24 टीम, 04 मार्च 2021:- पुणे जिल्ह्यातून तडिपार झालेला निलेश घायवळ याने जामखेड तालुक्यात मुक्काम ठोकला होता. तेथे त्याने मोठ्या प्रमाणात समाजकार्य सुरू केले होते.
तो निवडणुकीला उभा राहणार असल्याचीही चर्चा होती. त्याने गावात सुधारणा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले होते. मात्र, आता पुढील वर्षभर त्याचा मुक्काम कारागृहात असणार आहे.
यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणूकही तो लढू शकणार नाही निलेश घायवळ याच्याविरुद्ध यापूर्वी मोक्का, खून, जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, खंडणी, दरोडा, दंगा, मारामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील सोनेगाव येथून ताब्यात घेतले. देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत प्रस्ताव पाठवला होता.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यावर निर्णय घेत घायवळला स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी घायवळ टोळीचा म्होरक्या निलेश घायवळला अटक केली आहे. पुढील वर्षभरासाठी त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे.