आता हेच राहिले होते ! CNG कार वापरत असाल तर ही बातमी वाचाच…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 12 सप्टेंबर 2021 :- वाढत्या महागाईमध्ये सामान्य नागरिक भरडला जात असताना, आता पुढील महिन्यात महागाईचा आणखी भडका उडणार आहे. सीएनजी आणि पीएनजीचे दर 10 ते 11 टक्क्यांपर्यंत वाढण्याची शक्यता आहे

ऑईल अँड न्युचरल गॅस कॉर्पोरेशनसारख्या सरकारी (ओएनजीसी) कंपन्यांना नामांकनाच्या आधारे देण्यात आलेल्या क्षेत्रासाठी सरकार दर सहा महिन्याला नैसर्गिक गॅसच्या किमतीचा आढावा घेत असते.

त्यानुसार पुढचा आढावा १ ऑक्टोबर रोजी घेतला जाणार आहे. ऑक्टोबरमध्ये सीएनजी आणि पीएनजी (पाइपलाइनद्वारे पुरवला जाणारा स्वयंपाकाचा गॅस) गॅसच्या किमतीत ५० ते ११ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्‍यता आहे. आयसीआयसीआय सिक्युरिटीजच्या एका अहवालात हा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ब्रोकरेज कंपनीच्या अहवालानुसार हवालानुसार १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२२ पर्यंत एपीएम वाढून ३.१५ डॉलर प्रति युनिट (एमएमटीटीयू ) इतका होईल. सद्यःस्थितीत हा दर १.७९ डॉलर प्रति युनिट इतका आहे. अहवालानुसार सरकारकडून निश्चित केलेल्या गॅसच्या किमतीत सुमारे ७६ टक्के वाढ केली जाणार आहे.

याचा थेट परिणाम सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीवर होईल. नैसर्गिक गॅस हा एक प्रकारचा कच्चा माल समजला जातो. याचे रूपांतर वाहनामध्ये वापरल्या जाणार्‍या सीएनजी आणि स्वयंपाकाच्या पीएनजीमध्ये केले जातो.

रिपोर्टनुसार, ‘एपीएम गॅस किंमतीत झालेली वाढ सिटी गॅस डिस्ट्रिब्युशन (CGD) कंपन्यांसाठी आव्हान असणार आहे. याचा अर्थ असा की याकरता सीएनसी आणि पीएनजीचा खर्च वाढेल.

एपीएम गॅसच्या किमती वाढल्यामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात सीएनजीचे वितरण करणारी कंपनी इंद्रप्रस्थ गॅस लि. (IGL) ला पुढील एका वर्षात किमतींमध्ये प्रचंड वाढ करावी लागेल. मुंबईत सीएनजीचा पुरवठा करणाऱ्या एमजीएललाही असेच पाऊल उचलावे लागेल