ताज्या बातम्या

Google : भारीच की! आता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शनही वाचता येणार, लवकरच लाँच होणार नवीन फिचर

Published by
Ahmednagarlive24 Office

Google : अनेकदा आपल्याला डॉक्टरांचे हस्ताक्षर वाचता येत नाही. ते फक्त मेडिकलमध्ये काम करणाऱ्यांना आणि डॉक्टरांनाच वाचता येते. काहीजणांना डॉक्टरांनी काय लिहून दिलंय हे जाणून घेण्याची इच्छा असते.

लवकरच तुमची समस्या दूर होणार आहे. कारण गुगल एक जबरदस्त फीचर्स घेऊन येणार आहे. त्यामुळे या फीचरच्या मदतीने तुम्हाला आता डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन वाचता येणार आहे.

काय आहे नवीन फीचर

आता गुगल लेन्सच्या मदतीने डॉक्टरांच्या खराब हस्ताक्षराचे डीकोडिंग होणार आहे. म्हणजेच आता तुम्हाला डॉक्टरांनी लिहिलेल्या प्रिस्क्रिप्शनचा फोटो स्मार्टफोनमधून किंवा स्कॅन करून गुगल लेन्स ते अक्षर काय आहे ते सांगणार आहे.

इतकेच नव्हे तर तुम्हाला ते शेअरही करता येणार आहे.परंतु, कंपनीने या फीचरच्या रोलआउट तारीख सांगितली नाही. त्याशिवाय भारतीय युजर्स सर्वात जास्त गुगल लेन्सचा वापर करतात.

असे करेल काम

हे फीचर केवळ गुगल ट्रान्सलेट फीचर अंतर्गत काम करणार असून फोटो कॅप्चर करून आणि गुगल लेन्सच्या मदतीने ते स्कॅन करून कोणताही शब्द दुसऱ्या भाषेत ट्रान्सलेट करता येणार आहे.

म्हणजेच आता तुम्हाला शब्द ट्रान्सलेट करण्यासाठी तुमचा स्मार्टफोनच मदत होईल. विशेष म्हणजे तुम्हाला गुगल लाईव्ह ट्रान्सलेटचा पर्याय देत आहे.

‘प्रोजेक्ट वाणी’

Google सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या मदतीने AI/ML मॉडेल तयार करण्याची योजना आखत असून इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सशीही भागीदारी केली आहे. या प्रकल्पाला ‘प्रोजेक्ट वाणी’ असे नाव दिले आहे.

या प्रकल्पांतर्गत विविध भारतीय प्रादेशिक भाषांचे संकलन आणि लिप्यंतरण केले जाईल. कंपनी देशातील एकूण 773 जिल्ह्यांमधून मुक्त-स्रोत भाषेचे नमुने संग्रहित करणार आहे. याच्या मदतीने देशात गुगलच्या व्हॉईस कमांड्समध्ये सुधारणा करता येईल.

Ahmednagarlive24 Office