हद्दच झाली ! CNG च्या किंमतीत ६२ टक्क्यांची रेकॉर्डब्रेक वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 01ऑक्टोबर 2021 :-   पेट्रोल आणि डिझेलच्या पाठोपाठ आता नैसर्गिक वायूच्या किंमती देखील वाढवण्यात आल्या आहेत. दोनच दिवसांपूर्वी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवल्यानंतर केंद्र सरकारने गुरुवारी हा निर्णय जाहीर केला आहे.

नैसर्गिक वायूच्या किंमती तब्बल ६२ टक्क्यांनी वाढवण्यात आल्या आहेत. हाच नैसर्गिक वायू सीएनजी इंधन बनवण्यासाठी वापरला जातो. १ ऑक्टोबर अर्थात आजपासूनच पुढच्या ६ महिन्यांसाठी ही दरवाढ लागू होणार आहे.

१ ऑक्टोबरपासून कठीण तेल क्षेत्रातून उत्पादित होणाऱ्या नैसर्गिक वायूचे दर प्रति दशलक्ष ब्रिटीश थर्मल युनिटसाठी (BTU) २.९० डॉलर इतके असणार आहेत. हा नैसर्गिक वायू प्रामुख्याने सीएनजी आणि मोठ्या शहरांमध्ये पाईपद्वारे पुरवण्यात येणाऱ्या घरगुती गॅसच्या निर्मितीमध्ये वापरला जातो.

त्यामुळे नैसर्गिक वायू दरवाढीपाठोपाठ सीएनजी आणि पाईपने पुरवल्या जाणाऱ्या घरगुती गॅसच्या किंमती देखील वाढण्याची शक्यता आहे. नैसर्गिक वायूची किंमत अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि रशियातील सरासरी दराच्या आधारे दर सहा महिन्यांनी ठरवण्यात येते.

मागील काही आठवड्यांपासून रुपयाची किंमत घसरली आहे. त्याचा फटका आता ग्राहकांना बसणार आहे. नैसर्गिक वायूची किंमत डॉलरमध्ये असते. त्यातच डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्यामुळे खर्चात वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. सीएनजी आणि पीएनजी गॅस वितरकांसाठी गॅसची किंमत वाढली आहे.

त्यामुळे आता दरवाढीचा फटका सीएनजी व पीएनजी ग्राहकांना बसणार आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली होती.

त्यामुळे पेट्रोलचे दर शंभरीपार गेले होते. तर डिझेलही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 107.26 रुपये तर एका लीटल डिझेलसाठी 96.19 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत प्रतिलीटर पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 101.19 आणि 88.62 रुपये इतका आहे.