हे काय भलतंच; त्यांनी केला चक्क बिबट्यावर हल्ला! तो’ झाडावर चढला अन्यथा..?

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17  जुलै 2021 :- नुसते त्याचे नाव जरी ऐकले तरी भल्या भल्याची भीतीने गाळण उडते. मोठ मोठ्या प्राण्यांची सहज शिकार करणाऱ्या बिबट्यावर चक्क रानडुकरांनी हल्ला केला. यावेळी बिबट्या नारळाच्या झाडावर चढला अन्यथा त्याचीच शिकार झाली असती.

ही घटना राहाता तालुक्यातील राजुरी येथे घडली. या बाबतची माहिती अशी की राहाता तालुक्यातील राजुरी येथे जुन्या गावातील दक्षिण मुखी हनुमान मंदिर कडे जाणाऱ्या रोड लगतच ओढा व नाल्याची जागा असल्यामुळे या ठिकाणी कायम पाणी असते.

त्यामुळे या परिसरात अनेक प्राणी असतात. आज पर्यंत शेळ्या,मेंढ्या, गायीच्या कालवडी, कुत्रे अशा प्राण्यांवर हल्ला करून बिबट्याने त्या फस्त केल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मात्र भालेराव यांची वस्ती असून त्यांच्या वस्तीच्या कडेला नारळाचे झाडे आहेत, नुकतीच पहाटेच्या वेळी रानडुकराने चक्क बिबट्यावरच हल्ला केला,

यावेळी मोठ्याने किंकाळण्याचा आवाज आल्याने भालेराव यांना जाग आली व त्यांनी मागच्या खिडकीतून बाहेर पाहिले असता चक्क बिबट्या नारळाच्या झाडावर चढलेला त्यांना दिसला

त्यानंतर खाली असणारे काही रान डुक्कर दिसले यानंतर तो ही खिडकी लावून घरच्यांना आवाज देऊन जागे केले परंतु तोपर्यंत रानडुक्कर व बिबट्या खाली उडी मारुन निघून गेले.

अहमदनगर लाईव्ह 24