अहमदनगर Live24 टीम, 22 जानेवारी 2022 :- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये काल शनिवारी कांद्याच्या भावात 200 रुपयांनी घट झाली.
भाव जास्तीत जास्त 2800 रुपयांपर्यंत निघाले. शनिवारच्या लिलावासाठी 320 वाहनांतून 58 हजार 328 गोण्या कांदा मार्केटमध्ये आला होता. बुधवारच्या तुलनेत तो 2 हजार गोण्यांनी कमी होता.
एक-दोन लॉटला 2700 ते 2800 रुपयांपर्यंत भाव मिळाला. मध्यम मोठ्या कलर पत्ती कांद्याला 2200 ते 2500 रुपयांपर्यंत भाव मिळाला.
मुक्कल भारी कांद्याला 2000 ते 2100 रुपये, गोल्टा कांद्याला 1200 ते 1500 रुपये, गोल्टी कांद्याला 1100 ते 1400 रुपये जोड कांद्याला 400 ते 500 रुपये भाव मिळाला. हलका डॅमेज कांद्याला 300 ते 400 रुपयांचा भाव मिळाला.