ताज्या बातम्या

म्हणूनच ‘त्यांनी’ चुलीवर थापल्या भाकरी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑक्टोबर 2021 :- केंद्रातील भाजपा सरकारने घरगुती वापराच्या गॅस, डिझेल, पेट्रोलच्या केलेल्या विक्रमी दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने घोषणाबाजी करून निदर्शने करत निषेध करण्यात आला.

यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सांगितले, की गेल्या काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकारने इंधन पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत विक्रमी दरवाढ केलेली आहे.

त्यामुळे देशातील सर्वसामान्य जनता या महागाईने होरपळलेली आहे. एकीकडे देशात सुमारे एक ते दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट कोसळलेले आहे,

त्यातच सर्वसामान्य जनतेचा रोजगार गेलेला आहे व जनतेच्या रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. सर्वसामान्य जनता त्रस्त झालेली आहे.

यावर उपाय म्हणून केंद्र शासनाने त्वरित पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅस व जीवन आवश्यक वस्तूंची दरवाढ मागे घ्यावी व सर्वसामान्य जनतेचा विचार करून त्यांना दिलासा द्यावा.

अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेस, राहाता शहर व तालुक्याच्या वतीने तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

Ahmednagarlive24 Office