अहमदनगर Live24 टीम, 25 ऑगस्ट 2021 :- आज बहुतांश कामासाठी आधार कार्ड बंधनकारक करण्यात आले आहे,. यामुळे आधार कार्ड हे अत्यंत महत्वाचे बनले आहे. मात्र राहुरी तालुक्यात आधार कार्ड केंद्रच बंद असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सुरु व्यक्त केला जातो आहे.
याप्रकरणी राहुरीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना साकडे घातले आहे. राहुरी शहरात एकमेव असलेले व तालुक्यात 5 या प्रमाणे नवीन आधार नोंदणीसाठी केंद्र सुरू होते.
त्यापैकी मोठ्या गावातील दोन आधार केंद्र तर कधीच बंद झाले आहेत. एकूण 3 सुरू असलेले आधार केंद्रांपैकी देवळाली व राहुरी या मोठ्या लोकसंख्येच्या नगरपरिषद असलेल्या गावातील आधार केंद्र गेल्या एक महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
राहुरी शहर व तालुक्यात नवीन आधार नोंदणी जवळपास एक महिन्यापासून बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांची मोठी अडचण होत आहे.
तरी जिल्हाधिकारी यांनी याबाबत कार्यवाही करून आधार केंद्र पुन्हा सुरू करावे, अशी मागणी राहुरी शहर व तालुक्यातील नागरिकांकडून होत आहे.