अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस पथकाने त्याचे घरी छापा टाकून अटक केली आहे.
बंगड्या उबर्या काळे (वय 35 वर्ष, रा.सुरेगाव ता. श्रीगोंदा) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, वर्षभरापूर्वी संगमनेर तालुक्यातील ‘हॉटेल प्राईड’ चे मालक आशिष चंद्रकांत कानडे.
वय 39 वर्षे (रा.कळंब ता.आंबेगाव. जि. पुणे) यांचा आरोपी बंगड्या उबर्या काळे याने खून केला होता. तसेच 40,000 रु. रोख रक्कम चोरून नेली होती.
या घटनेबाबत फिर्यादी सुनिल बळीराम पवार, वय- ४९ वर्षे, धंदा- वेटर, रा. सिंदखेडा, जि- धूळे यांनी घारगांव ता. संगमनेर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
गुन्हा दाखल झाल्यनंतर या गुन्ह्यातील आरोपी मिथून उंबर्या काळे हा फरार झालेला होता. या फरार आरोपीचा शोध घटना पोलिसांना गुप्त माहिती समजली कि,
वरील गुन्ह्यातील आरोपी मिथून काळे सुरेगांव, ता- श्रीगोंदा येथे त्याचे घरी आला असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा लावून मिथून उंबर्या काळे, वय- 22 वर्षे, रा. सुरेगांव शिवार, ता- श्रीगोंदा यांस ताब्यात घेतले.
आरोपी मिथून उंबर्या काळे याचे विरुध्द सुपा पो.स्टे. येथे दाखल असून या गुन्ह्यात फरार असल्याने त्यांस सुपा पो.स्टे. येथे हजर करण्यात आलेले आहे.