अहमदनगर Live24 टीम, 11 फेब्रुवारी 2021:-मागील तीन वर्षापासून फरार असणारा दरोड्याच्या गुन्ह्यातील आरोपीला शहरातील वसंत टेकडी परिसरात सापळा लावून अटक करण्यात आली आहे.
प्रमोद बाळासाहेब कराळे (वय 34 रा. वसंत टेकडी, अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 19 फेब्रुवारी 2018 ला ट्रकमध्ये 4 लाख रुपयांच्या कांद्याने भरलेल्या 450 गोळ्या घेऊन ट्रकचालकासह वांबोरी येथील मार्केटमध्ये विक्रीसाठी घेऊन जात असताना सायंकाळी राहुरीजवळ आले असता,
शामराव भागवत गाडे (रा. घोरपडवाडी ता. राहुरी) व त्याच्यासोबत असणाऱ्या तीन अनोळखी इसमांनी ट्रक आडवून कांद्यासह बळजबरीने चोरून नेला.
दरम्यान अर्जुन काशिनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्यातील फरार आरोपी प्रमोद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
अखेर पोलिसांनी कराळेला वसंतटेकडी, अहमदनगर परिसरात सापळा लावून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडला. आरोपी कराळे याच्यावर यापूर्वी तोफखाना, राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.