त्या सराईत आरोपीस पोलिसांनी केले गजाआड

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 मे 2021 :-तालुक्यातील कामरगाव येथे अपघात करून दोन व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेला रेकॉर्डवरील सराईत आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे.

उमेश उर्फ ओंकार मधुकर शिंदे (रा. पिंपरीआंतरवन जि.बीड ) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, ओंकार शिंदे याने त्याच्या ताब्यातील चोरीचे वाहन (क्रमांक एम एच बारा एच एन ८४६२) हे रस्त्याने भरधाव वेगात चालून दोन व्यक्तींचा अपघात करून फरार झाला होता.

पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला पकडले आहे. सदर आरोपीकडून पाच लाखाची बोलेरो वाहन देखील जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान या गुन्ह्यात अपघातातील वाहन हे आरोपीने हिंजवडी येथील गोदरेज कंपनी समोरून चोरून आणल्याची कबुली दिली असून त्याबाबत हिंजवडी पोलीस स्टेशन जिल्हा पुणे येथे गुन्हा दाखल आहे.

या सराईत आरोपीला सापळा लावूूून नगर तालुुुुका पोलिसांनी बोलेरो जीपसह शिताफीने जेरबंद केले. सदर आरोपीकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24