मनपाचा कारवाईचा बडगा सुरूच; साडेसहा लाखाहून अधिकचा दंड केला वसूल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :-  कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यात कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहे. मात्र अनेकदा नागरिकांकडून या नियमांची पायमल्ली केली जात असल्याचे दिसून आले.

आता याच अनुषंगाने नगर महानगरपालिका कार्यक्षेत्रात 16 मार्च ते 6 जून दरम्यान करोना नियम मोडणार्‍या 545 आस्थापना आणि नागरिक यांच्याकडून 6 लाख 63 हजार रुपयांचा रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

दरम्यान नगर महानगपालिकेचे आयुक्त शंकर गोरे यांनी प्रभाग समिती निहाय करोना दक्षता पथक स्थापन केले. या पथकाने करोना नियम मोडणार्‍या 545 आस्थापना आणि नागरिक यांच्यावर 6 लाख 63 हजार 700 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शहरातील भाजी बाजार, मुख्य व उपनगर बाजारपेठा येथील करोना नियमावली कडक अंमलबजावणीसाठी दक्षता पथक सहायक सूर्यभान देवघडे,

राहुल साबळे, नंदकुमार नेमाणे, भास्कर आकुबत्तीन, राजेश आनंद, अमोल लहारे, किशोर जाधव यांनी परिश्रम घेतले तसेच करोना महामारीच्या काळात रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, शहरातील नागरिक या आजारापासून सुरक्षित राहावेत

त्यासाठी करोना नियमांची कडक अंमलबजावणी व्हावी या हेतूने स्थापन झालेल्या पथकांनी नागरिक आणि महापालिका यांच्यात आयुक्त मार्गदर्शनाखाली समन्वयाचे काम करण्यात आल्याचे नजन यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24