अभिनेत्रीने अंगावरचे सर्व कपडे स्टेजवरच काढले, जाणून घ्या काय आहे प्रकरण !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

फ्रेंच ऑस्कर सोहळ्यामध्ये एक खळबळजनक घटना घडली आहे. या सोहळ्यामध्ये एका अभिनेत्रीने चक्क स्टेजवर सर्वांसमोर कपडे उतरवले.

या अभिनेत्रीचे नाव कोरिन मासेरियो असे असून ती ५७ वर्षांची आहे. कोरिन जेव्हा स्टेजवर गेली तेव्हा तिने गाढवासारखा पोषाख परिधान केला होता.

 

या अगळ्यावेगळ्या ड्रेसवर रक्ताचे डाग असल्याचे पाहायला मिळते. कोरिनच्या या ड्रेसने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. दरम्यान तिने असे काही केले की तेथे उपस्थित असलेले सर्वजण थक्क झाले.

मागच्या तीन महिन्यांपासून फ्रान्समधील चित्रपटगृह बंद आहेत. फ्रेंच अभिनेत्री कोरिन मासेरियोचं म्हणणं आहे की, सरकारनं करोना व्हायरसच्या संक्रमणादरम्यान संस्कृती आणि कलेशी संबंधित लोकांना पाठिंबा द्यायला हवा.

कोरिन मासेरियो स्टेजवर बेस्ट कॉस्ट्यूम अवॉर्ड देण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र स्टेजवर येताच सर्वांसमोर कपडे उतरवत तिनं सर्वांनाच चकित केलं.

ती सर्वांसमोर नग्नावस्थेत उभी होती आणि यासोबतच कोरिननं फ्रान्सचे पंतप्रधान जीन कॅस्टेक्स यांना उद्देशून आपल्या पाठीवरही संदेश लिहिला होता. तिच्या पाठीवर लिहिण्यात आलेला हा संदेश फ्रेंच भाषेत होता.

ज्यात लिहिलं होतं, ‘आमची संस्कृती आम्हाला परत द्या जीन’ ज्याचा अर्थ, ‘आम्हाला आमचं पैसे कमावण्याचं साधन परत द्या’ असा होतो. याआधी गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शेकडोंच्या संख्येनं कलाकार, दिग्दर्शन,

संगीतकार आणि चित्रपट टेक्निशिअन्स यांनी आंदोलन केलं होतं. पॅरिसमध्ये चित्रपट आणि कला वाचवण्यासाठी त्यांनी आवाज उठवला होता. फ्रान्सने अद्याप देशात थिएटर आणि चित्रपटगृहांवर प्रदर्शनाला बंदी घातली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24