अहमदनगर Live24 टीम, 30 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात सुरु असलेला कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव याला अटकाव करण्यासाठी तसेच कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ हि मोही हाती घेतली होती.
आता याच मोहिमेअंतर्गत कुटुंबाचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता प्रशासन आता उपाययोजनात्मक निर्णय घेत आहे.
याचाच भाग म्हणून आता या मोहमेअंतर्गत आरोग्य पथक प्रत्येकाच्या घरी जाऊन कोरोनाची लक्षणे या मोहिमेत तपासणार आहेत.
त्याचबरोबर संशयितांना लगेच विलगीकरण कक्षात दाखल करणार आहेत. विभागीय आयुक्तांनी याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. दरम्यान विभागीय आयुक्तांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात २८ एप्रिल ते २ मार्च या दरम्यान ही मोहीम चालणार आहे.
मागील वर्षीही ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’अंतर्गत कुटुंबांचे सर्वेक्षण करून कोरोनाची लक्षणे असणाऱ्या रुग्णांना वेळेत विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले.
त्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार झाले आणि कुटुंबातील इतरांना होणारा संसर्ग आटोक्यात आला; परंतु या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होत आहे. त्यातून रुग्णांची ऑक्सिजन पातळी खालावली आहे.
आगामी रुग्णांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. त्या अनुषंगाने पुन्हा ही मोहीम राबविण्याचे शासनाने ठरवले आहे.
त्याअंतर्गत आरोग्य पथकाद्वारे गृहभेटी देऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्याची माहिती गोळा केली जाणार आहे.
या यादीतील व्यक्तींची त्यादिवशी टेस्ट करण्याची जबाबदारी वैद्यकीय अधिकाऱ्यांची असेल. गावाची कुटुंब संख्या विचारात घेऊन सात दिवसांत सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत सूचना आहेत.