अहमदनगर Live24 टीम, 18 ऑगस्ट 2021 :-श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे.
दरम्यान हि आक्रमक कारवाई अपर तहसीलदार चारूशीला पवार यांच्या पथकाने केली असून या पथकाने संबंधित ठिकाणी छापा टाकून वाळू वाहतूक करणारे तीन ट्रक ताब्यात घेतले आहे.
वाळू तस्करांनी एक वाहन चिखलात फसविले होते; परंतु पथकाने रात्री १ वाजेपर्यंत अथक प्रयत्न करून ट्रक बाहेर काढला. या कारवाईत नायब तहसीलदार डॉ. योगिता ढोले, महसूल सहायक सतीश घोडेकर, मंडळ अधिकारी, तलाठी मापारी, मोरे,
पोलीस कर्मचारी राजू भोर, गोरे आदींनी केली. महसूल विभागाचे घोड व भीमा नदीपात्रातील वाळू चोरीवर लक्ष राहणार आहे. अवैध वाळू चोरी निदर्शनास आल्यावर नागरिकांनी तहसील कार्यालयास माहिती द्यावी.
महसूल विभाग अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणाऱ्यांवर कडक कारवाई सुरूच ठेवणार असल्याचे चारुशीला पवार यांनी सांगितले.