अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी झाला आहे. यामुळे काहींसे निर्बंध शिथिल करण्यात आले आहे.
यामुळे आता प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या सहनशीलतेचा जास्त अंत न पाहता त्वरित टाळेबंदी उठवावी व व्यापारी आस्थापणे उघडण्यास परवानगी द्यावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी केली आहे. नुकतेच राज्य शासनाने कोरोनाबाबतचे नवे नियम लागू केले आहे.
यामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण कमी झाले आहे. अशा ठिकाणी निर्बध शिथिल करावे असे सांगण्यात आले आहे. आता याच अनुषंगाने कोपरगाव तालुक्यातील व्यापाऱ्यांनी आपली आस्थापने चालू करण्यासाठी परवानगी द्यावी असा घोषा लावला आहे.
त्यात कोपरगाव तालुक्याचा समावेश आहे. त्याबाबत नुकतीच एक बैठक कोपरगाव व्यापारी महासंघाने नगराध्यक्ष विजय वहाडणे व व्यापारी मंडळींमध्ये झाली. शहरातील सर्व व्यापारी संघटनांच्या बैठकीत व्यावसायिकातील असंतोष बघता येणाऱ्या काळात त्याचा स्फोटही होऊ शकतो अशी स्थिती आहे.
सध्या कोपरगावचा कोरोनावाढीचा वेगही मंदावलेला आहे,ऑक्सिजनच्या पुरेशा खाटा उपलब्ध आहेत.म्हणून आता तरी आढावा घेतांना या सर्व सकारात्मक बाजूंचा विचार करून कोपरगावचे सर्व व्यवहार सुरळीत करून सर्वांनाच दिलासा द्यावा अशी विनंती त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात केली आहे.