ताज्या बातम्या

माझ्यावरील आरोप हे राऊतांचे नसून उद्धव ठाकरेंचे, आघाडी सरकारच्या घोटाळ्याची लंका जाळणारच; किरीट सोमय्या

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबई : आज हनुमान जयंतीनिमित्त मनसे (MNS), भाजपसह (BJP) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील घटकपक्षांकडून हनुमान मंदिरात महाआरती आणि हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनीही आपण हनुमान मंदिरात जात महाविकास आघाडीच्या सरकारच्या घोटाळ्यांचे दहन करण्यासाठी शक्ती मागणार असल्याचे म्हटले आहे.

सोमय्या म्हणाले की, हनुमान जयंतीनिमित्त आज मंदिरात जाऊन देवाकडे शक्ती मागणार. मविआ सरकारच्या घोटाळ्याचं दहन करण्यासाठी, त्यांच्या घोटाळ्याची लंका जाळण्यासाठी प्रार्थना करणार. महाविकास आघाडी सरकारमधील २४ घोटाळे बाहेर काढले आहेत.

नवाब मलिकांपासून ते आदित्य ठाकरेंपर्यंत सगळ्यांचे घोटाळे काढले. प्रवीण कलमे सध्या उद्धव ठाकरे यांच्या कार्यालयात येत जात असतो. लोकं आता संजय राऊतांवर हसू लागले आहेत.

माझ्यावरील आरोप हे राऊतांचे नाही तर उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) आहेत. १०० कोटींच्या घोटाळ्याचा आरोप काल केला, परवा सामनात ३ कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता. ही सगळी नौटंकी आहे, अशी टीका सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान, राज्यात सध्या मशिदींवरील भोंगे (Loudspeakers on Mosque) आणि हनुमान चालीसावरुन राजकारण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. मशिदींवरील भोंगे हटवण्यासाठी राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

भोंगे हटवण्यासाठी त्यांनी सरकारला ३ मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिला आहे. इतकेच नाही तर भोंगे हटवले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज यांनी मनसैनिकांना दिले आहेत.

Ahmednagarlive24 Office