पैशासाठी रुग्णवाहिका चालकाने मृतदेह घेऊन जाण्यास दिला नकार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात कोरोनाबाधितांची वाढ होत आहे,तसेच जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.

एकीकडे आपली व्यक्ती सोडून जात असल्याचे दुःख दुसरीकडे मरणानंतरही त्या मयताला यातना सहन करावा लागत असल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात दिसून येत आहे. मयत रुग्णाचा मृतदेह घेऊन

जाण्यासाठी रुग्णवाहिका चालकांकडून सध्या रुग्णाच्या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहे. लोक मारतायत मात्र माणुसकी बाजूला सारून आता रुग्णवाहिकांकडून या स्थितीचे भांडवल केले

जात असल्याचा प्रकार नगरमध्ये खुलेआम सुरु झाला आहे. नुकतेची अशीच एका एका घटना पुन्हा समोर आली आहे.राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे मयत करोना रुग्णाच्या नातेवाईकांची ग्रामीण रुग्णालयातील काही कर्मचारी व रुग्णवाहिका चालकांकडून पैशासाठी अडवणूक करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. चे उघड झाले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब (तांबेवाडी) येथील एका व्यक्तीच्या कुटुंबात मुलगी सोडून कोणी नातेवाईक नसल्याने व मुलगी तांदुळवाडी येथे असल्याने ती व्यक्ती तांदुळवाडी येथे राहत असताना करोना झाला.

मुलीच्या कुटुंबातील सर्व सदस्य देखील पॉझिटिव्ह असल्याने सर्वजण वेगवेगळ्या ठिकाणी उपचार घेत असताना या साधारण 62 वर्षीय व्यक्तीचे वांबोरी ग्रामीण रुग्णालयात सकाळी 8.45 वाजता निधन झाले.

परंतु मुलगी, जावई पॉझिटिव्ह असल्याने दूरचे दोन नातेवाईक अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी त्याठिकाणी दाखल झाले. मात्र, रुग्णवाहिका चालक तसेच रुग्णालयातील काही कर्मचार्‍यांनी अंत्यविधी वांबोरी येथेच होईल.

परंतु यासाठी 12 हजार रुपये खर्च येईल, असे सांगितले. या व्यक्तीच्या कुटुंबातील कोणी सदस्य नाही व मुलीच्या घरातील सर्वजण पॉझिटिव्ह असल्याने उपचार घेत आहेत, असे सांगूनही त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही.

त्यानंतर हे प्रकरण थेट वांबोरी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी, डॉ. पाठक व तहसीलदार फसियोद्दीन शेख यांच्यापर्यंत पोहचल्यानंतर

त्यांनी ताबडतोब चक्र फिरवून रुग्णालयातील कर्मचारी व रुग्णवाहिकाचालकांनी माघार घेत 6 हजार रुपये खर्चात अंत्यविधी प्रक्रिया पूर्ण होईल, अशी भूमिका घेतली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24