मिरावली पहाडवर उभारली जातेय आमराई वृक्ष जगविण्यासाठी ठिबक पध्दतीचा अवलंब

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- रोटरी इंटिग्रीटी क्लबने पर्यावरण संवर्धन मोहिमेतंर्गत मिरावली पहाड येथे वृक्षरोपण अभियान राबविले. मिरावली पहाडचे मुजावर यांच्या सहकार्याने 35 केशर आंब्याच्या झाडांचे लागवड करुन पहाडवर आमराई उभारली जात आहे.

तर लावलेली वृक्ष जगविण्यासाठी ठिबक पध्दतीने पाणी देण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. वृक्षरोपण अभियानप्रसंगी रोटरी इंटिग्रीटीचे अध्यक्ष तथा माजी समजा कल्याण अधिकारी रफिक मुन्शी, मिरावली पहाडचे मुजावर बाबासाहेब जहागीरदार, मोतईन जहागीरदार आदी उपस्थित होते. रफिक मुन्शी म्हणाले की,

एक दिवसाचा पर्यावरण दिन साजरा करण्याऐवजी वर्षभर पर्यावरणाप्रती आस्था प्रत्येकाच्या मनात रुजली पाहिजे. कोरोनाने पर्यावरणासह ऑक्सिजनचे महत्त्व जगा समोर आनले. मनुष्याने काळाची गरज ओळखून या वृक्षरोपण मोहिमेत सहभागी होण्याची गरज आहे. वृक्ष जगले, तर सजीव सृष्टी टिकेल ही भावना प्रत्येकाने लक्षात घेतली पाहिजे. पर्यावरण संवर्धनासाठी रोटरी इंटिग्रीटीने पुढाकार घेतला असून,

फक्त झाडे लाऊन न थांबता ती जगविण्यासाठी योगदान दिले जात असल्याचे सांगितले. तर रोटरी इंटिग्रीटी मागील दोन वर्षी पासून वृक्षरोपण करुन त्याचे संवर्धन करीत आहे. दोन वर्षापुर्वी मिरावली पहाड येथे लावलेली झाडे जगविण्यात आली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 वर्षी नागरदेवळे येथील कब्रस्तानमध्ये लावण्यात आलेली गुलमोहोर, चिंच, लिंबाची 60 झाडे लाऊन ती जगविण्यात आली आहे. सदर झाडे चांगली बहरली असून, या झाडांची वर्षपुर्ती देखील करण्यात आली. 

अहमदनगर लाईव्ह 24