अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :-राज्यात १५ दिवसांच्या लॉकाडाउची घोषणा करण्यात आलेली आहे.
दरम्यान, आज राज्याचे आरोग्यमंत्री यांनी राज्यातील आरोग्य यंत्रणेचा आढावा घेत, संबंधितांना काही महत्वपूर्ण सूचना देखील केल्या आहेत.
या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली. यावेळ त्यांनी बेड्सच्या तुटवडयाच्या मुद्याबाबत देखील माहिती दिली.
बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही, रूग्णसंख्येनुसार बेड्सची संख्या वाढवलीचं पाहिजे, असा इशारा आपण दिला असल्याचं त्यांनी सांगितलं.
राजेश टोपे म्हणाले, “सगळ्यात महत्वाचं बेड मॅनेजमेंट मी ज्याला म्हणेल, रूग्णसंख्येचा जिल्ह्याचा ग्रोथ रेट काय आहे.
त्या गतीनुसार बेड्स देखील वाढलेच पाहिजे. बेड्स नाही हे उत्तर मी कदापि सहन करणार नाही. वैद्यकीय सुविधा किंवा आरोग्य सुविधा वाढवल्या गेल्या पाहिजे.
जिथं आवश्यकता असेल तिथं ऑक्सिजनेटेड बेड्स वाढवले गेले पाहिजेत. रूग्णालयात जागा नसेल तर एखाद्या संस्थेत वाढावा, कुठंही वाढावा पण बेड्स नाहीत अशी परिस्थिती होता कामा नये.