अहमदनगर Live24 टीम, 13 जून 2021 :- महिला अत्याचाराच्या घटनांची वाढ काही केल्या थांबताना दिसत नाही आहे. नुकतेच एका 16 वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करीत तिला गरोदर ठेवण्याचा खळबळजनक प्रकार संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे परिसरात घडला आहे.
याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. याबाबत अधिक सविस्तर माहिती अशी कि, आरोपी राजेंद्र नामदेव कांदळकर (रा. जोर्वेकर वस्ती, तळेगाव दिघे) याने परिसरातील एका 16 वर्षे 3 महिने वयाच्या अल्पवयीन मुलीवर सुमारे एक वर्षांपासून बळजबरीने अत्याचार केले.
अत्याचारातून पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर राहिली. पीडित मुलीचे आई-वडील शेळी चारण्यासाठी गेले असता आरोपी राजेंद्र नामदेव कांदळकर याने हे अत्याचाराचे कृत्य केले. कुणाला काही सांगू नको अशी धमकी दिली.
अत्याचारातून पीडित मुलगी गरोदर राहिल्याने आई-वडिला समवेत पोलीस ठाण्यात जाऊन पीडित मुलीने फिर्याद दिली.
त्यानुसार आरोपी राजेंद्र नामदेव कांदळकर विरुद्ध बलात्कार तसेच बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह विविध कलमानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.