अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- भारतीय हवामान खात्याने दिलेल्या इशार्यानूसार जिल्ह्यात मान्सून पूर्व वादळी पावसाला सुरूवात झाली आहे. जिल्ह्यात दोन दिवसांपासून मान्सून पूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरूवात केली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोेंद ही श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव मंडलात 67.3 मि.मी आणि नगर तालुक्यातील वाळकी मंडळात 66.8 मि.मी. पावसाचा समावेश आहे.
जिल्ह्यात 14 तालुक्यात 97 महसूल मंडळे असून यातील आठ मंडळात एकाच दिवशी एक इंचापेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून कर्जत मंडळात 39 मि.मी. म्हणजेच जवळपास एक इंच पाऊस झालेला आहे.
या पावसामुळे जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्यांच्या पूर्व तयारीला वेग येणार आहे. तर दक्षिण जिल्ह्यातील तालुक्यात कडधान्यांच्या तयारीला सुरूवात होणार आहे.
तालुकानिहाय पाऊस (मि.मी) :- नगर 27.9, पारनेर 13.8, श्रीगोंदा 13.3, कर्जत 17.3, जामखेड 31.3, शेवगाव 14.6, पाथर्डी 13.8, अकोले 13.2, नेवासा 8.1, राहुरी 4.7, संगमनेर 6, कोपरगाव 4.2, श्रीरामपूर 19.6, राहाता 3.6 असे आहेत.
जिल्ह्यात शनिवारी दुपारनंतर अनेक ठिकाणी वादळी वार्यासह, विजांच्या कडकडासह पावसाला सुरूवात झाली.
यामुळे अनेक भागात वीज गायब झाली. काही तालुक्यात वादळामुळे घरांवरील पत्रे उडाले असून संगमनेर तालुक्यात वीज पडून एका व्यक्तीसह काही शेळ्या दगावल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाली आहे.