अहमदनगर Live24 टीम, 21 जुलै 2021 :- जागरण गोंधळाचा कार्यक्रम करणाऱ्या मुरळीवर तिघांनी अत्याचार केल्याची घटना नगर तालुक्यात घडली होती.
याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यातील एकाचा जिल्हा न्यायाधीश मंजुषा देशपांडे यांनी नुकताच जामीन अर्ज फेटाळला आहे. या बाबतची सविस्तर महिती अशी की,
१ एप्रिल २०२१ रोजी या घटनेतील पीडित महिला जागरण गोंधळाचा कार्यक्रम उरकून वाघ्याबरोबर मोटारसायकलवर तिच्या घरी जात असताना मध्यरात्री तिघांनी तिच्यावर आळीपाळीने अत्याचार करून ९ हजार रूपये काढून घेत त्यांना मारहाण केली होती. याबाबत तिघांना अटक केली.
दरम्यान यातील एकाने जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. परंतु पीडित महिलेने संबंधित आरोपी पासून आपल्या जिविताला धोका आहे. त्यामुळे त्यास कुठल्याही परिस्थिती जामीन मंजूर करू नये, अशी विनंती वकिलामार्फत न्यायालयात केली होती.त्यानुसार जामीन फेटाळून लावला आहे.