अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :-एका राष्ट्रीयकृत बँकेच्या सेवा केंद्र चालकास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांकडून जबर मारहाण करण्यात आली.
हि धक्कादायक घटना अकोले तालुक्यातील कोतूळ येथे घडली आहे. कोतूळ येथे एका राष्ट्रीयकृत बँकेचे सेवा केंद्र चालवत असलेल्या धनंजय सुभाष बोराडे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
यावरून अकोले पोलीस ठाण्यात 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत अधिक माहिती अशी कि,
कोतूळ येथील एका राष्ट्रीयकृत बँकेचे ग्राहक सेवा केंद्र चालवत असलेल्या धनंजय सुभाष बोराडे यांच्या बाबत फेसबुकवर काही आक्षेपार्ह मजकूर शिक्षक असलेल्या प्रशांत गिते यांनी टाकला.
या बाबत धनंजय बोराडे यांनी गीते याना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता प्रशांत गीते यांनी त्यांचा भाऊ सचिन गिते व मोहन सखाराम खरात, तसेच गणेश (बैल्या) खरात व इतर गुन्हा असलेला अक्षय लहानू खरात यांनी बोराडेस मारहाण केली.
याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात प्रशांत गीते, सचिन गिते, अक्षय लहानू खरात, मोहन सखाराम खरात, गणेश उर्फ बैल्या भिका खरात अशा पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विशेष म्हणजे अकोले पोलिसांत संबंधितांपैकी काही आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून यातील काही आरोपी तडीपार यादीतील आहे.