सुपारी सावकारचे शेत जमीनीच्या वादातून आखेर पलायन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 फेब्रुवारी 2021 :-पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनच्या वतीने सुपारी सावकारांचा बिमोड करण्याची चळवळ सुरु करण्यात आलेली असताना, पारनेर येथील एका सुपारी सावकाराने प्रकरण अंगलट येत असल्याने शेत जमीनीच्या वादातून आखेर पलायन केले.

हे संघटनेच्या आंदोलनाचे यश असल्याची माहिती सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनाचे यमनाजी म्हस्के व कायदे सल्लागार अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी दिली.

म्हस्केवाडी (ता. पारनेर) येथील यमनाजी म्हस्के यांच्या ताब्यातील गट नं.416 मधील 1 हेक्टर 9 आर आणि गट नं. 415 मधील 18 आर बागायती जमीन भागचंद साकला या सावकाराने सन 1988 साली ताब्याशिवाय गहाण ठेवल्या.

या जमीनीवर म्हस्के यांचे घर असून, ही जमीन ते कसतात. दत्तात्रय फुले याने साकला सावकाराकडून ताब्याशिवाय खरेदी घेतली.

हे प्रकरण न्यायप्रविष्ट असताना जिल्हा न्यायालयाने सदर जागा म्हस्के यांच्या ताब्यात असल्याचे स्पष्टीकरण देऊन फुले विरोधात या जमीनीवर येण्याबाबत मनाई हुकूम काढला.

या प्रकरणातून जमीन म्हस्के यांच्या ताब्यातून काढून घेण्यासाठी राहुल गायकवाड नामक सुपारी सावकाराने पुढाकार घेतला.

दत्तात्रय फुले याने गायकवाड याला मुखत्यारपत्र दिले. याचा वापर करुन गायकवाड याने खोटे कागदपत्र तयार करुन दि.12 डिसेंबर 2020 रोजी स्वत:लाच या जमीनीची खरेदी दिली.

पीपल्स हेल्पलाईन व सावकारी शोषणा विरोधी जन आंदोलनाने या विरोधात आवाज उठविला असता हे प्रकरण अंगलट येत असल्याचे पाहून

गायकवाड याने दि.27 जानेवारी 2021 रोजी पुर्वीचे सर्व खरेदी रद्द करुन या शेत जमीन जमीनीच्या वादातून आखेर पलायन केले असल्याची माहिती अ‍ॅड. गवळी यांनी दिली आहे.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24