अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- शिक्षण विभागाच्या मान्यतेनूसार उद्या सोमवार पासून 11 वीची ऑनलाईन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. यात 16 ते 23 ऑगस्ट दरम्यान संबंधीत ज्युनिअर कॉलेज अथवा उच्च माध्यमिक महाविद्यालयाना प्रवेश अर्ज भरून घेता येणार असून त्यानंतर 26 ताखेला अकरावी प्रवेशासाठी पहिली गुणवत्त यादी प्रसिध्द करण्यात येणार आहेत.
कोरोनामुळे दहावीची परीक्षा न होता मुल्यमापनावर आधारीत दहावीचा निकाल जाहीर झाला असून यामुळे निकालाची टक्केवारी 99.97 टक्के आहे. दहावीच्या निकालानंतर राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने 11 वी प्रवेशासाठी सीईटीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता.
मात्र, न्यायालयाने सीईटीची परीक्षा न घेता 11 वी प्रवेश प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. राज्यात काही ठिकाणी ही प्रक्रिया ऑनलाईन होणार आहे. दरम्यान, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रामदास हराळ यांनी याबाबत
15 ऑगस्ट रोजी 11 वी प्रवेश प्रक्रियेबाबत आदेश काढले आहेत. यात उद्यापासून ही प्रक्रिया जिल्ह्यात राबविण्यास सुचवले आहे. यात ज्युनिअर कॉलेज अथवा उच्च माध्यमिक महाविद्यालयानी उद्यापासून प्रवेश प्रक्रिया राबविण्यास सांगण्यात आले आहे. असे आहे वेळापत्रक
16 ते 23 ऑगस्ट दरम्यान विद्यार्थ्याकडून प्रवेशाचा अर्ज भरून घेणे, अथवा ज्युनिअर कॉलेजने जमा करणे.
24 आणि 25 ऑगस्ट प्राप्त अर्जाचे संगणिकरण करणे.
26 ऑगस्ट पहिला गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे.
27 ऑगस्ट पहिल्या गुणवत्ता यादीवर आक्षेप नोंदवणे.
28 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान प्रथम गुणवत्ता यादी प्रसिध्द करणे. 2 सप्टेंबरला पहिल प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे.
2 ते 4 सप्टेंबर पहिल्या गुणवत्ता यादीनूसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे.
6 ते 9 सप्टेंबर दरम्यान दुसरी प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे.
11 सप्टेंबर तिसरी प्रतिक्षा यादी प्रसिध्द करणे. 11 ते 14 तिसर्या प्रतिक्षा यादीनूसार प्रवेश प्रक्रिया राबविणे.