ताज्या बातम्या

iPhone 12 वर आतापर्यंतचा सर्वात मोठा डिस्काउंट, मिळतोय एकदम स्वस्तात

Published by
Ahmednagarlive24 Office

आयफोनचे लेटेस्ट मॉडेल जरी बाजारात आले तरी आयफोन 12 ची क्रेझ कायम राहणार आहे. कदाचित त्यामुळेच आतापर्यंत ग्राहक मोठ्या संख्येने हा आयफोन खरेदी करत आहेत. इतकंच नाही तर काही वेळा लेटेस्ट आयफोन मॉडेल्सलाही या मॉडेल्सकडून कडव्या स्पर्धेला सामोरं जावं लागतं. फ्लिपकार्ट आता आयफोन 12 मॉडेलवर भरपूर सूट देत आहे. ही डिस्काऊंट ऑफर इतकी दमदार आहे की, ग्राहक त्यावर बरीच बचत करू शकतात.

iPhone 12 वर मोठा डिस्काउंट
APPLE iPhone 12 (Black, 64 GB) स्टोरेज असणारे मॉडेल ग्राहकांना फ्लिपकार्टवर सवलतीच्या दरात खरेदी करता येईल. फ्लिपकार्टवर सेल संपल्यानंतरही ग्राहक डिस्काउंटसह ते खरेदी करू शकतात. हा फोन फ्लिपकार्टवर हा फोन 49,900 रुपयांना उपलब्ध आहे. मात्र, 19 टक्के सवलतीसह ग्राहक केवळ 39999 रुपयांत खरेदी करता येणार आहे.

एक्सचेंज ऑफरमुळे आकर्षण वाढले
या डीलमध्ये आयफोन 12 साठी एक्सचेंज ऑफरचाही समावेश आहे. आयफोन 12 आणखी स्वस्तात खरेदी करण्यासाठी तुम्हाला तुमचा जुना स्मार्टफोन द्यावा लागेल, त्या बदल्यात तुम्हाला 35,599 रुपयांचा एक्सचेंज डिस्काउंट मिळू शकतो.

iPhone 12 चे फीचर्स
APPLE iPhone 12 (Black, 64 GB) ए 14 बायोनिक चिपवर काम करतो. 5 जी सेवेसह हा आयफोन 6.1 इंचाचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्लेसह येतो. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये दिलेले दोन्ही सेन्सर 12MP आणि फ्रंट कॅमेरा देखील 12MP चा आहे. या फोनवर एक वर्षाची ब्रँड वॉरंटी देण्यात आली आहे.

Ahmednagarlive24 Office