Redmi K50i 5G : रेडमीच्या ‘या’ शक्तिशाली स्मार्टफोनवर मिळत आहे आतापर्यंतची सगळ्यात मोठी सवलत, इतक्या स्वस्तात खरेदी करू शकता

Redmi K50i 5G : काही दिवसांपूर्वी रेडमीचा K50i 5G हा स्मार्टफोन लाँच झाला होता. या स्मार्टफोनची किंमत भारतीय बाजारात 25,999 रुपयापासून सुरु आहे.

जर तुम्ही हा शक्तिशाली स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक जबरदस्त ऑफर आहे. कारण Amazon च्या सेलमध्ये तुम्ही हा स्मार्टफोन स्वस्तात खरेदी करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

फीचर्स

रेडमीच्या K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंच स्क्रीनवर फुल HD+ LCD डिस्प्ले दिलाअसून याची ब्राइटनेस 650 nits आहे. या डिव्हाइसमध्ये MediaTek Dimensity 8100 octa core प्रोसेसर कंपनीने दिला आहे.

जो Android 12 आधारित MIUI 13 वर काम करेल. रॅम आणि मेमरीबद्दल सांगायचे झाले तर, हा स्मार्टफोन 6 GB रॅम, 128 GB अंतर्गत स्टोरेज आणि 8 GB RAM, 256 GB अंतर्गत स्टोरेजच्या 2 मॉडेलसह येतो.

या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिलेला असून ज्याचा प्राथमिक कॅमेरा 64 MP आहे. यामध्ये एक 8 MP अल्ट्रा-वाइड अँगल कॅमेरा आणि 2 MP मॅक्रो कॅमेरा आहे. यासोबतच सेल्फीसाठी फ्रंटमध्ये 16 एमपी कॅमेरा दिला आहे.

फोनमध्ये ड्युअल स्पीकर, WiFi 6, ब्लूटूथ, 4D व्हायब्रेशन, टाइप C चार्जिंग सपोर्टसह 3.5 मिमी ऑडिओ जॅक प्रदान केला आहे. पॉवरसाठी 5080 mAh बॅटरी देण्यात आली आहे. चार्जिंग सपोर्ट 67 W साठी उपलब्ध आहे.

Redmi K50i 5G किंमत आणि ऑफर

या स्मार्टफोनमध्ये 2 मॉडेल आहे. यामध्ये 6 जीबी रॅम, 128 जीबी स्टोरेज असून किंमत 25,999 रुपये इतकी आहे. त्याचबरोबर 8 जीबी रॅम, 256 जीबी स्टोरेज मॉडेलची किंमत 28,999 रुपये आहे.

Amazon च्या या सेलमध्ये फोनचा 6 GB मॉडेल 24,999 रुपयांना उपलब्ध आहे. आधीच्या किमतीपेक्षा पूर्ण 1,000 रुपये स्वस्त आहे. याशिवाय Amazon या फोनवर 1000 रुपयांचे कूपन देखील देत आहे, ज्यासाठी अर्ज करावा लागेल. ज्यातून तो 23,999 रुपयांना उपलब्ध होईल.