अहमदनगर Live24 टीम, 27 एप्रिल 2021 :-सध्या देशभरात ऑक्सिजन टंचाई निर्माण झाली असून वाढत्या कोरोना रुग्ण संख्ये मुळे व वेळेत ऑक्सिजन उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्ण दगावत आहेत.
जिल्ह्यातही अशीच परिस्थिती असून नगर जिल्ह्यातील ऑक्सिजन टंचाईची समस्या सोडविण्यासाठी विखे पाटील परीवार सुमारे दिड कोटी रूपये खर्च करून ऑक्सिजन प्लॅन्ट उभारणार असल्याची घोषणा खा.डॉ सुजय विखे पाटील यांनी केली आहे.
सर्वच रुग्णालया समोर सध्या ऑक्सिजनचा प्रश्न निर्माण झाला आहे. शासकीय पातळीवरूनही ऑक्सिजन उपलब्ध होण्याच्या असलेल्या मर्यादा लक्षात घेवून विळद घाटात आ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प तातडीने उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
संपूर्ण आधुनिक परदेशी तंत्रज्ञान वापरून हा जिल्ह्य़ातील पहिलाच प्रकल्प ठरणार असल्याचे विखे पाटील म्हणाले.
असून दहा दिवसात हा प्रकल्प कार्यान्वित होणार आहे सद्यस्थितीत विळद येथील कोव्हीड केअर सेंटरमध्ये १५० ऑक्सिजन बेड आहेत.
नविन ऑक्सिजन प्रकल्प उभारल्यानंतल बेडची संख्या ३०० करणार येणार असल्याचे विखे पाटील यांनी सांगितले.