अहमदनगर Live24 टीम, 18 मे 2021 :- अहमदनगर जिल्हा पुन्हा एकदा हनीट्रॅप प्रकरणामुळे आता चर्चेत येवू लागला आहे.
मागील आठवड्यात नगर तालुक्यातील एका गावात किराणा दुकान चालविणाऱ्या महिलेने नगर शहरात राहणाऱ्या तिच्या साथिदाराच्या मदतीने हा गुन्हा केल्याचे उघड झाले होते.त्यानंतर हनीट्रॅप ची वेगवेगळी प्रकारणे समोर येत आहेत.
क्लासवन अधिकारी ब्लॅकमेल :- नगर तालुका पोलिसांनी उघडकीस आणलेल्या हनीट्रॅपमध्ये एका क्लासवन अधिकाऱ्यास ब्लॅकमेल केल्याचे समोर आले आहे. आज नगर तालुक्यात पुन्हा दुसरा खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन कोटींची खंडणी मागितली :- अधिकाऱ्याने ब्लॅकमेलर टोळीविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. या अधिकार्याकडे तीन कोटींची खंडणी त्या तरूणीने मागितली होती. दोन कोटी देण्याचे त्या अधिकार्याने कबूल केले होते. त्यातील 80 हजार रूपये त्याने दिले होते.
बलात्काराचा गुन्हा दाखल करेन :- त्यांच्या सोबत नाजूक संबंध ठेवत त्याचा व्हिडीओ शूट केला होता. आम्हास 3 कोटी रुपये आणुन दे नाहीतर सदर अश्लील व्हीडीओ हा पोलीसांना दाखवुन तुझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करेन अशी धमकी सदर गुन्ह्यातील आरोपांनी दिली होती.
यांच्या विरोधात गुन्हा दाखल :- यामध्ये संबंधित तरूणीसह एजंट अमोल मोरे, सचिन खेसे (रा. हिगंणगाव ता. नगर), सागर खरमाळे, महेश बागले (दोघे रा. नगर) यांचा आरोपीमध्ये समावेश आहे. सचिन खेसे याला पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी :- दरम्यान अशा पद्धतीने आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधितांनी न घाबरता पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन अतिरिक्त पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल यांनी केले आहे.