ताज्या बातम्या

सर्वात मोठी बातमी राज्यातील 8 वी ते 12 वीचे वर्ग या दिवशी होणार सुरु

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 30 सप्टेंबर 2021 :- लॉकडाऊनचा एक भाग म्हणून राज्य सरकारने राज्यातील सर्व शासकीय आणि खासगी शाळा, कनिष्ठ महाविद्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

आता कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असून शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागात 5 वी ते 12 वी आणि शहरी भागात इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग 4 ऑक्टोबरपासून सुरु करण्याला परवागनी देण्यात आली आहे. त्यानुसार बृहन्मुंबई क्षेत्रातील सर्व माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग मार्गदर्शक सूचनांचं पालन करुन सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुंबईतल्या शाळा सुरु करण्याच्या प्रस्तावाला मुंबई महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी मंजुरी दिली आहे. इतर वर्गाच्या शाळा कधी सुरू करायच्या, याचा निर्णय नोव्हेंबरमध्ये घेतला जाणार आहे. आता शासन निर्णयानुसार राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 वी ते 12 वी व शहरी भागातील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग दि 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरु करण्यास परवानगी दिलेली आहे.

निर्णयामधील मार्गदर्शक सूचना सोबतच खालीलप्रमाणे अन्य सूचना निर्गमित करण्यात येत आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनाच्या व सर्व माध्यमाच्या शाळांमधील इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग सुरु करण्यास आवश्यकतेनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांना उपस्थित ठेवावे.

शाळा सुरु करण्यापूर्वी व शाळा सुरु झाल्यानंतर आरोग्य, स्वच्छता व इतर सुरक्षा विषयक उपाययोजनांबाबतच्या मार्गदर्शक सूचना सोबत जोडण्यात आलेल्या ( परिशिष्ट अ व ब ) नुसार कार्यवाही करण्यात यावी. बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळांचे सहाय्यक आयुक्त

यांच्या सहाय्याने सोडीयम हायपोक्लोराईड सोल्युशनने निर्जतुंकीकरण करुन घेण्यात यावे तसेच, इतर व्यवस्थापनांच्या शाळांनी आपल्या स्तरावर वर्गांचे निर्जतुंकीकरण करुन घ्यावे. बृहन्मुंबई महानगरपालिका शाळांमध्ये इ. 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळांमधील कोविड लसीकरण केंद्र व कोविड विलगीकरण कक्ष सहाय्यक आयुक्त यांच्या सहाय्याने अन्य ठिकाणी स्थलांतरीत करुन वापरण्यायोग्य सुस्थितीत करावे.

कोविड सेंटर, रेल्वे स्टेशनवर कोविड लसीकरण प्रमाणपत्र पडताळणी करण्यासाठी तसेच, निवडणुक विषयक कामासाठी नेमण्यात आलेल्या शिक्षक कर्मचा-यांना कार्यमुक्त करुन घ्यावे. बृहन्मुंबई महानगरपालिका अधिपत्याखालील शाळांनी आपल्या शाळांमधील इ. 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग असलेल्या शाळा नजीकच्या महानगरपालिकेच्या किंवा खाजगी आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात

Ahmednagarlive24 Office