अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2021:-गोंदिया जिल्हातील अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगांवबांध येथील आझाद चौकातील रहिवाशी, शेतकरी दिनेशचंद्र उजवणे यांच्याकडे गेल्या काही अनेक वर्षांपासून पाळीव गायी आहेत,
त्यातील एका गाईने एक विचित्र वासराला जन्म दिला आहे, या नवजात वासराला दोन डोके,चार डोळे आहेत शारीरिक व्यंग असलेल्या विचित्र वासराचा जन्म झाल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती ऐकावे ते नवलच या उक्ती प्रमाणे,
अहो आश्चर्यम,असे म्हणून हा निसर्गाचा अदभूत असामान्य चमत्कार परिसरात चर्चेचा विषय झाला आहे.
या विचित्र वासराला चार पाय व दोन कान सामान्यपणे आहेत. दोन डोक्याचा वासरू उजवणे यांच्याकडे जन्माला आला आहे, त्यामुळे या वासराला पाहून लोकांनीं आश्चर्य व्यक्त केला आहे,