जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरुच

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 एप्रिल 2021 :-गेल्या काही दिवसांपासून रेमडेसिविरच्या इंजेक्शनची काळाबाजारी मोठ्या प्रमाणात होत आहे.

करोना रुग्णांसाठी आवश्यक रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या विरोधात प्रशासनाकडून कारवाया करण्यात येत आहे मात्र तरी देखील हा काळाबाजार सुरुच असल्याच्या अनेक घटना वारंवार समोर येत आहे.

नुकतेच जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये इंजेक्शनमध्ये पाणी भरून त्याची विक्री करणाऱ्यास पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेतले. रईस अफजल शेख (रा. मातापूर), असे आरोपीचे नाव आहे.

दरम्यान रेमडेसिविर इंजेक्शन तातडीने उपलब्ध होत नसल्याने रुग्णांचे नातेवाईक मेटाकुटीस आले असताना राज्यात मात्र अनेक ठिकाणी रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार सुरू आहे.

मुंबई, कोल्हापूर, औरंगाबाद, नगरसह अनेक भागांत याप्रकरणी अनेक जणांना अटक करण्यात आली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24