अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याचा वावर वाढू लागला आहे. तसेच भक्ष्याचा शोधात बिबट्याची मानवीवस्तीकडे वाटचाल होऊ लागली आहे. यातच अनेकदा दुर्घटनेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची देखील घटना घडली आहे.
यातच राहाता तालुक्यातील हनुमंतगाव शिवारात एका उसाचे शेतात मृत बिबट्या आढळून आला. हनुमंतगाव परिसरात बिबट्यांची संख्या लक्षणीय असून मागील आठवड्यातच रस्ता पार करताना एका बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
दरम्यान याबाबाबत अधिक समजलेली माहिती अशी कि, सदर मृत झालेला बिबट्या नर असून अंदाज वय 4 वर्ष असावे असा अंदाज आहे.
मृत बिबट्याचा मृत्यू हा दोन बिबट्यांच्या झुंजीमध्ये झाला असून सत्तेसाठी किंवा अन्नासाठी ही लढाई झाली असावी, असे वन विभागाने सांगितले.
मृत बिबट्याची उत्तरीय तपासणी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. दशरथ दिघे यांनी केली. सदर बिबट्याचा दफनविधी वनविभागचे सुराशे यांच्या उपस्थितीत राजेंद्र घोलप यांच्या शेतात करण्यात आला.