अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- संगमनेर तालुक्यातील पारेगाव खुर्द येथील एका विहिरीत विवाहितेचा मृतदेह आढळून आला. ही घटना काल सकाळी उघडकीस आली.
रेश्मा रुपेश मोकळ (वय २४) असे या मयत विवाहितेचे नाव आहे. रेश्मा हिचा विवाह गतवर्षी रुपेश मोकळ याच्याबरोबर झाला होता. काल सकाळी तिचा मृतदेह विहिरीत आढळला.
तिच्या मृत्युची खबर समजताच माहेरकडील मंडळी पारेगाव खुर्द येथे आले. पोलीस निरीक्षक पांडूरंग पवार हे सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले.
मुलीच्या मृत्यूप्रकरणी घातपात असल्याचा आरोप तिच्या वडीलांनी केला. दोषींविरुध्द कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
सर्व नातेवाईक दुपारी घुलेवाडी येथील पोलीस ठाण्यात जमा झाले होते. पोलिसांनी पंचनामा करुन मृतदेह ग्रामीण रुग्णालयात दाखल केला. रात्री उशिरापर्यंत याबाबत गुन्हा दाखल झालेला नव्हता.