अहमदनगर Live24 टीम, 13 जुलै 2021 :- भंडारदरा धरणात शुक्रवारी बुडालेल्या व शनिवारी पाण्यावर तरंगताना सापडलेल्या अज्ञात तरुणाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यात राजूर पोलिसांना यश आले. तो मृतदेह सागर विजय थोरात याचा आहे.
तो कोल्हेवाडी (ता. संगमनेर) येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी रविवारी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. मी लग्नास जातो आहे, असे सांगून सागर थोरात घराबाहेर गेला.
त्याने शनिवारी जलाशयात उडी घेतली. ही घटना तेथीलच काही व्यवसायिकांनी बघितली व पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शुक्रवारी धरणातील पाण्यात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.
शनिवारी सायंकाळनंतर मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला. पोलिसांना मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वृत्तपत्र व सोशल मीडियाची मदत झाली. त्याव्दारे पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. सोमवारी रात्री उशिरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.