अहमदनगर Live24 टीम, 5 जुलै 2021 :- गावातून जाऊन येतो असे सांगून घराबाहेर पडलेला व्यक्तीचा अपघाती मृत्य झाला. हि दुर्दैवी घटना राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथे घडली आहे. परितोष रामचंद्र कुलकर्णी (वय 38) असे अपघात झालेल्या व्यक्तीच नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, रामचंद्र कुलकर्णी यांच्या जुन्या जागेतून डंपरने माती वाहतूक दिवसभर सुरू होती.
परितोष हा गावातून येतो, असे घरी सांगून पायी चालत निघाला असता थोडे अंतर चालून गेल्यावर त्याच्या पाठीमागून सुमारे पाचशे फूट अंतरावरून माती भरलेला डंपर येत होता.
मात्र या डंपरच्या मागील टायरखाली परितोष सापडल्याने तो जागीच ठारझाला. घटनेची माहिती पोलीस पाटील नामदेव जगधने यांनी पोलीस ठाण्यात दिली.
पोलिसांनी तात्काळ येऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी राहुरी येथे पाठविण्यात आला. देवळाली पोलीस ठाण्याचे पोलीस हेडकॉन्सटेबल प्रभाकर शिरसाठ व पोलीस गणेश फाटक हे पुढील तपास करीत आहेत.