अहमदनगर Live24 टीम, 28 फेब्रुवारी 2021 :- राहता तालुक्यातील टिळकनगर येथील सिद्धार्थ बाळू सुतार या (वय -25 वर्ष) या तरुणाचा पाठ कॅनॉल पाण्यात बुडून मृत्यू झाला. नार्दन ब्रँच येथे सिद्धार्थचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला.
याबाबत अधिक माहिती अशी कि, सिद्धार्थ टिळकनगर येथे आपल्या दोन चुलत्या सोबत राहत होता. त्याचे आई वडील हे कुर्ला येथे राहायला आहे. मृत सिद्धार्थ शुक्रवारी संध्याकाळपासून घरी नव्हता.
स्थानीक सूत्रांकडून दिलेल्या माहितीनुसार कॅनॉलच्या पाण्याची पातळी अत्यंत खालावली असून अवघे गुडक्या इतके पाणी आहे. मृत सिध्दार्थचे पाण्यात बुडून मृत्यू झाले कसे, आणि विशेषक रून सिद्धार्थला पोहता येत असल्याने सिद्धार्थचा मृत्यू संशयास्पद असल्याचे परिसरात चर्चेला उधाण आले आहे.
मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल काळे, पोलीस नाईक पंडित, पोलीस कॉन्स्टेबल वाघमारे करीत आहे.