अहमदनगर Live24 टीम, 30 जानेवारी 2022 :- बॉलिवूडची नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्रींनपैकी उर्वशी रौतेला ही एक आहे. उर्वशीने अनेकांना आपल्या नव्या स्टाईलने घायाळ तर केलेच शिवाय आपल्या नावे मानाचा तुराच रोवला आहे.
उर्वशीने अरब फॅशन वीक या मानच्या फॅशन शोमध्ये तब्बल ४० कोटींचा सोन्याने बनविलेला ड्रेस परिधान करुन सर्वाना अवाक करुन सोडले.
उर्वशीने परिधान केलेला हाय डीप कट स्लिप्ट गोल्डन ॲम्बेलिश्ड गाऊन चाहत्यांना घायाळ करुन सोडत आहेत. हा गोल्डन रॉब खूपच मोठा आणि जमिनीवर पसलेला. तिने घातलेला हेडगिअर खऱ्या सोन्याचा आणि हिऱ्यांचा बनवलेला आहे.
प्रसिद्ध डिझायनर फर्ने वन अमाटो यांनी या ड्रेसचे डिझाईन केले आहे. अमाटो यांनी यापुर्वी बेयॉन्से आणि जेनिफर लोपेज यांचे ड्रेस सुद्धा डिझाईन केले आहेत.
उर्वशी रौतेला अरब सुपरस्टार मोहम्मद रमादन याच्या सोबतच्या ‘वर्साचे बेबी’ या गाण्यामध्ये नुकतीच दिसली होती. ती सध्या ‘इन्स्पेक्टर अविनाश’ नावाची वेब सिरीज करत असून
यामध्ये ती रणदीप हुड्डा सोबत दिसणार आहे. तसेच ती ब्लॅक रोज या थ्रिलर चित्रपट व ‘थिरुट्टू पायले २’ या चित्रपटाच्या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.