file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  पाथर्डी शहरालगत असणाऱ्या हंडाळवाडी येथे अवघ्या सहा महिन्यांपूर्वी बांधलेल्या पुलाचा काही भाग पहिल्याच पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

पुलासह रस्ता देखील वाहून गेल्याने वाहतुक ठप्प झाली आहे. शहर व तालुक्यात दोन दिवसापूर्वी मुसळधार पाऊस झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे.

अशातच हंडाळवाडी येथील मोहरी रोड ते खोर्दे वस्ती कडे जाणारा विठ्ठल नगर येथील पुलाचा काही भाग व मोठ्या प्रमाणात रस्ता वाहून गेल्याने परिसरातील शेतकरी व वाहनधारकांना वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.

याबाबत बोलताना परिसरातील नागरिक म्हणाले कि,छोट्या आकाराचे पाईप पुलाखाली टाकल्याने पाण्याचा तूंब तयार झाला.

यामुळे नजीकच्या शेतामध्ये पाणी जाऊन मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले. यासह शेतकऱ्यांच्या कोंबड्या,शेळ्या,जीवनावश्यक वस्तू सह एक बैलगाडी देखील वाहून गेली आहे.