म्हशीला तर पाणी नाही मिळाले मात्र; पण ‘त्याने’ आपला जीव गमावला!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:-आज कोरोनासह इतर विविध प्रकारच्या कारणांमुळे मानवाचे जीवन असह्य झाले आहे. त्यात परत काहीजण किरकोळ कारणावरून एकमेकांच्या जीवावर उठत आहेत.

अशीच धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील माळीण गावात घडली आहे. केवळ म्हशीला पाणी पाजण्याच्या वादातून एका व्यक्तीची हत्या केली आहे.

धक्कादायक घटना घडली आहे. साठे (४०, पूर्ण नाव माहीत नाही) असे मृत व्यक्तीचे नाव आहे तर बापू लक्ष्मण जोरी (२४) असे आरोपीचे नाव आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, साठे आणि आरोपी जोरी यांच्यात जमिनीचा वाद होता. त्यावरून अनेक वेळा त्यांच्यात भांडणं देखील झाली होती.

सोमवारी दुपारच्या सुमारास साठे म्हशीला पाणी पाजण्यासाठी घेऊन जात होते. याचवेळी बापूसोबत त्यांचा वाद झाला. हा वाद इतका वाढला की, बापू याने घरी जाऊन छर्‍याची बंदूक आणली आणि गोळी झाडली.

गोळी लागल्यानेसाठे जागीच कोसळले. साठे यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहून आरोपी बापूने घटनास्थळावरुन पळ काढला. साठे यांना रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं.

  • ब्रेकिंग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24