राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी; विखेंनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 05 नोव्हेंबर 2021 :- राज्यातील सामान्य नागरिक आणि शेतकरी अडचणीत आहे. अशावेळी आघाडी सरकारचे मंत्री मात्र, स्वतःला लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत.

राज्यातील जनता उपाशी आणि मंत्री तुपाशी असा घणाघात भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

लोणी प्रवरानगर येथील प्रवरा शिक्षण संस्था आणि साखर कारखान्यात राधाकृष्ण विखे यांनी सपत्निक लक्ष्मीपूजन केले.त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना विखे म्हणाले की, आघाडी सरकारवर लक्ष्मी रूसलीय की प्रसन्न आहे,

माहीत नाही. मात्र, हे स्वतःलाच लक्ष्मीकरता प्रसन्न करून घेत आहेत. राज्यातील जनता अडचणीचे असताना मंत्र्यांचा वेळ महसूल गोळा करण्यात चालला आहे.

शेतकरी उपाशी आणि मंत्री तुपाशी अशी अवस्था झाली आहे अशी टीका विखे पाटील यांनी केली. राज्यात महाविकास आघाडीचे मंत्री भ्रष्टाचारात गुंतलेत ,

भ्रष्टाचाराचे सर्व विक्रम मंत्र्यांनी मोडलेत, त्यातून थोडं बाजूला येवून जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावं, असा खोचक टोला विखे पाटील यांनी थोरातांना लगावला.

Ahmednagarlive24 Office