‘श्रीरामपूर’च्या नव्या अपर पोलीस अधीक्षकपदाचा भार ‘या’ महिला अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 10 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर विभागाच्या अपर पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांना बढती मिळाली असून त्यांची नियुक्ती नाशिक येथील महाराष्ट्र पोलीस अकादमीत पोलीस अधिक्षकपदी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी बीडमधील आंबेजोगाई अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील ३१ आयपीएस आणि ५४ पोलीस उपायुक्त/अपर अधीक्षक यांच्यासह ९२ साहाय्यक पोलिस आयुक्त यांच्या बदल्या झाल्या. तसेच सहा सहाय्यक पोलीस अधीक्षक यांना उपायुक्त पदावर बढती देण्यात आली. औरंगाबाद, नागपूर, वाशिम, अमरावती धुळे, नंदुरबार जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची बदली झाली.

यातच जिल्ह्यातील पोलीस दलात देखील बदल्या झाल्या आहेत. स्वाती भोर यांनी यापूर्वी नगर जिल्ह्यातील संगमनेर येथे उपविभागीय अधिकारी म्हणून काम केलेले आहे.

तसेच नगर शहर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस उपअधीक्षक प्रांजल सोनवणे यांची सोलापूर शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी तर नगर शहर उपविभागाचे विशाल ढुमे यांची औरंगाबाद शहरच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बढती झाली आहे. तर पिंपरी चिंचवड येथील सहाय्यक पोलीस आयुक्त संजय नाईक यांची नगर पोलीस मुख्यालयात उपअधिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.