Success Story of Godrej : ब्रिटिश काळात कुलूप बनवण्यापासून झाली सुरवात आज सॅटेलाईटपर्यंत पसरला व्यवसाय, गोदरजेच्या ४२ हजार कोटींच्या बिझनेसची प्रेरणादायी कहाणी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Success Story of Godrej : आज विविध क्षेत्रातील अनेक मोठे ब्रँड निर्माण झाले आहेत. यातील एक दिग्गज ब्रँड म्हणजे गोदरेज. भारतासह परदेशातही ‘कपाट’ म्हटलं की गोदरेज हाच ब्रँड समोर येतो. या कंपनीच्या यशामागे एक अतिशय दिलचस्प कथा आणि वारसा आहे. हा ब्रँड भारताच्या स्वातंत्र्याच्या खूप आधी सुरू झाला होता आणि डॉ. एनी बेझंट आणि रवींद्रनाथ टागोर यांच्यासारख्या भारतातील महान व्यक्तींचा त्याला सपोर्ट होता. गोदरेज कंपनी इतकी लोकप्रिय होती की इंग्लंडच्या राणीने १९२१ मध्ये भारत भेटीदरम्यान याची विशेष दखल घेतली होती.

गोदरेजची कहाणी केवळ एका मोठ्या आणि विस्तृत अशा व्यवसायाची नाही. तर अशा व्यक्तीची आहे कि जो भारत पारतंत्र्यात असताना इंग्लंडमधून येणाऱ्या कुलुपांपेक्षा भारी कुलुपे बनवायचा आणि तीही एका छोट्याशा शेडमध्ये. ७ मे १८९७ रोजी अर्देशीर गोदरेज यांनी वकिली सोडून एका शेडमध्ये गोदरेज कंपनीची पायाभरणी केली. परदेशी बनावटीच्या कुलूपांमध्ये एक इंटिग्रेटेड स्प्रिंग आहे जी बऱ्याचदा तुटते. त्यामुळे त्यांना कुलूप बनवण्याची आयडिया आली. त्यांनी काम सुरू केले. इंग्लंडमधून आयात केलेल्या कुलुपांपेक्षा त्यांचे कुलूप अधिक किफायतशीर होते. अर्देशिर यांनी आपला भाऊ पिरोजशा यांच्यासोबत गोदरेज ब्रदर्सची स्थापना केली, जी आता गोदरेज ग्रुप म्हणून ओळखली जाते.

‘गोदरेज’ या नावामागची दिलचस्प कहाणी

अर्देशिर हा एक पारशी होता त्यांचा जन्म १८६८ मध्ये मुंबई येथे झाला. आई-वडिलांच्या सहा मुलांपैकी तो सर्वात मोठा होता. अर्देशिर तीन वर्षांचे असताना त्यांचे वडील बुर्जोरजी गुथेराजी यांनी कुटुंबाचे नाव बदलून गोदरेज केले आणि म्हणूनच कंपनीचे नावही ‘गोदरेज’ असे ठेवण्यात आले. लॉ स्कूलमधून पदवी घेतल्यानंतर आर्देशिर यांना १८९४ मध्ये बॉम्बे सॉलिसिटर फर्ममध्ये नोकरी मिळाली. परंतु त्यांनी हा व्यवसाय सोडला व नवीन व्यवसाय सुरु केला.

गोदरेज हा घरगुती ब्रँड बनला

गोदरेज यांनी १९२३ मध्ये अलमारी (स्टीलचे कपाट) सह फर्निचर ची सुरुवात केली. यानंतर ते घरोघरी पोहोचू लागले आणि लग्न समारंभात गोदरेजची उत्पादने देणे ही अभिमानाची बाब बनली. १९५२ मध्ये गोदरेजने सिंथॉल साबण बाजारात आणला आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा साबण उत्पादक म्हणून त्याला स्थान दिले. १९५८ मध्ये कंपनीने रेफ्रिजरेटर लाँच केले. १९९० च्या दशकात कंपनीने गोदरेज प्रॉपर्टीजची स्थापना करून भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात प्रवेश केला.

वर्षभरानंतर कंपनीने गोदरेज एग्रोवेटची स्थापना करून कृषी व्यवसायात प्रवेश केला. १९९७ मध्ये गोदरेजने समूह म्हणून आपल्या स्थापनेला १०० वर्षे पूर्ण केली. गोदरेजने २००५ मध्ये गोदरेज नेचर बास्केट लाँच करून किरकोळ बाजारात प्रवेश केला. 30 पेक्षा जास्त प्रीमियम आउटलेट्ससह, कंपनी सध्या जगभरात प्रीमियम वस्तूंसाठी भारतातील टॉप शॉपिंग डेस्टिनेशन बनलीय. २००८ मध्ये मानवरहित चांद्रयान-1 हे चंद्रावर पाठवणारा भारत पाचवा देश ठरला होता. गोदरेजही या मोहिमेत सहभागी झाले होते. या कंपनीने मोहिमेचे प्रक्षेपण यान आणि चंद्र ऑर्बिटर तयार करण्यात मदत केली. भारताच्या पहिल्या मंगळ मोहिमेवर भारतीय अंतराळ संशोधन संस्थेसोबत काम करण्याचा मान गोदरेजला मिळाला आहे. सॅटेलाईट लॉन्चिंग व्हीकल गोदरेज एयरोस्पेस इंजनद्वारे ऑपरेशनल आहे.

जगभरात पोहोचली Made in India प्रोडक्ट्स

अर्देशिर गोदरेज यांनी काम करण्यास सुरुवात केली तेव्हा भारत ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. पण अर्देशिरची देशभक्ती अशी होती की त्यांनी इंग्रजांपुढे न झुकता आपल्या कंपनीच्या उत्पादनांवर मेड इन इंडिया लिहायला सुरुवात केली. इंग्रज त्यासाठी तयार नव्हते. प्रोडक्टवर मेड इन इंडिया असे लिहिले तर त्याचे बाजारमूल्य कमी होईल, त्यामुळे प्रोडक्टची विक्री कमी होईल आणि इंग्रजांना नफा कमावण्याची संधी मिळणार नाही, अशी त्यांची धारणा होती. पण अर्देशिर यांनी माघार घेतली नाही. त्यामुळेच मेड इन इंडिया उत्पादनांनी देशात आणि जगात आपला ठसा उमटवला.

आज गोदरेज ही एक MNC कंपनी बनली आहे. तिचे मूल्य १.७६ लाख कोटी रुपये आहे. गोदरेज समूहात गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज अॅग्रोवेट आणि अॅस्टेक लाइफसायन्स या पाच लिस्टेड कंपन्या आहेत. आर्थिक वर्ष २०३३ मध्ये त्यांचा एकत्रित नफा ४,०६५ कोटी रुपये होता, तर आर्थिक वर्षात एकत्रित उलाढाल ४२,१७२ कोटी रुपये होती.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24