अहमदनगर Live24 टीम, 30 मे 2021 :- सध्याचा काळ हा आरोप-प्रत्यारोप आणि राजकारण करण्याचा नसून यात तीळभरही स्वारस्य न दाखविता केंद्र सरकारने सर्वप्रथम राज्यांसाठी कोरोना प्रतिबंधक लस खरेदी करावी, असे आवाहन दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी केले आहे.
दिल्लीतील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने ‘अनलॉक’ची प्रक्रिया सुरू करण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.
दिल्लीतील छत्रसाल येथील कोरोना लसीकरण केंद्राला अरविंद केजरीवाल यांनी भेट दिली. यावेळी पत्रकारांशी वार्तालाप करताना ते म्हणाले की, दिल्लीमध्ये गेल्या चोवीस तासांत सुमारे ९५६ रुग्ण आढळले आहेत.
तर दिल्लीतील शासकीय रुग्णालयात बुरशीजन्य आजारांचे ४५० रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातच लसींचा अभूतपूर्व तुटवडा निर्माण झाला आहे. अशावेळी ‘तू तू मंै मैं’ चे राजकारण सोडून केंद्र सरकारने राज्यांना तत्काळ लस उपलब्ध करून द्यावी.
सध्याची वेळ ही राजकारण करण्याची नाही. एकमेकांकडे बोट दाखविण्यात सध्या कोणीही वेळ घालू नये. कारण देश कोरोना महामारीची मोठी किंमत मोजत आहे.
त्यावर लसीकरण हाच एकमेव पर्याय आहे. म्हणून केंद्र सरकारने लस खरेदीची प्रक्रिया गतिमान केली पाहिजे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. जनतेला लस हवी आहे.