झोपडीतल्या अभ्यासाचं चीज; पशु वैद्यकीय अभ्यासक्रमात महाविद्यालतून प्रथम क्रमांक !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 31 मार्च 2021:-कोरोनामुळे झालेल्या लॉक डाऊननंतर सिधुदुर्ग जिल्ह्यातल्या दारिस्ते या आपल्या गावी आलेली आणि ऑनलाईन शिक्षणासाठी डोंगरावरच्या झोपडीतून अभ्यासाचे धडे गिरवणारी स्वप्नाली सुतार पशुवैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथून ११९ विद्यार्थ्यांमधून कॉलेजमध्ये ८.६ ग्रेड मिळवत प्रथम आली.

गेल्यावर्षी लॉकडाऊनमुळे स्वप्नाली गावी आली खरी, पण गावात इंटरनेट नेटवर्क मिळत नसल्याने तिला ऑनलाईन लेक्चर्स चुकू लागली. शेवटी गावच्या लगत दोन किलोमीटरवर असलेल्या डोंगरावर तिला नेटवर्क मिळाले.

तिथे तिच्या भावाने तिला झोपडी बांधून दिली आणि स्वप्नाली त्या झोपडीत जाऊन ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करत अभ्यास करू लागली.

स्वप्नाली पशु वैद्यकीय अधिकारी व्हायची जिद्द बाळगत मेहनतीने अभ्यास करत असल्याचे हे वृत्त प्रसारभारतीच्या दूरदर्शन आणि आकाशवाणीच्या माध्यमातून केंद्र सरकारपर्यंत पोहोचले.

लागलीच प्रशासकीय हालचाली झाल्या आणि केंद्र सरकारच्या भारत नेट प्रकल्पांतर्गत तिच्या घरी इंटरनेट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली.

दरम्यान नंतर स्वप्नाली घरूनच अभ्यास करू लागली आणि तिच्या मेहनतीचे आणि जिद्दीचे चीज झाले. स्वप्नाली शिक्षा घेत असलेल्या द्वितीय वर्ष परीक्षेचा निकाल जाहीर झाला.

या परीक्षेत महाविद्यालयातून स्वप्नालीन पहिला नम्बर मिळवला. त्यावेळी स्वप्नालीला काही समाजसेवी संस्थानी आणि व्यक्तींनी लॅपटॉप वगैरे देऊन मदत केली होती.

त्या दात्यांची मदत देखील स्वप्नालीच्या या यशाने सत्कारणी लागली आहे. स्वप्नालीच्या य यशाबद्दल तिचे अभिनंदन होत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24