चक्क शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांकडे मागितली गांजाची शेती करण्याची परवानगी

अहमदनगर Live24 टीम, , 06 फेब्रुवारी 2022 :-  जिल्ह्यातील तरुण शेतकरी नानासाहेब लोखंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे शेतात गांजा लागवडीसाठी परवानगी मागितली आहे. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला ईमेल व पोष्टाद्वारे निवेदन पाठवले आहे.

या पत्राची राहुरी तालुक्यात जोरदार चर्चा रंगली आहे. तसेच या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचेसह मुख्य सचिव, महसूल मंत्री, महसूल सचिव, जिल्हाधिकारी अहमदनगर व तहसिलदार श्रीरामपूर यांना पाठवल्या आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

अधिक माहिती अशी की, नानासाहेब शंकर लोखंडे हे जिल्हयातल्या राहाता तालुक्यातील तिसगांव येथील रहिवासी असून श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव येथे त्यांची शेत जमीन आहे.

नैसर्गिक संकटे यामुळे अनेक समस्यांना त्यांना तोंड द्यावी लागत असतात. दरम्यान नुकतेच राज्य सरकारने किराणा दुकानात वाईन विक्री करण्यास परवानगी देऊन गोड निर्णय घेतलाय.

त्यामुळे जेथे जाऊ तेथे सहज मद्य उपलब्ध होईल. असाच गोड निर्णय राज्यातील शेतकर्‍यांसाठी घ्यावा. मी व माझ्यासारखे अनेक शेतकरी गांजा लागवड करण्यासाठी इच्छुक आहेत.

आम्हाला गांजाची लागवड करण्यासाठी राज्य सरकारने परवानगी दिल्यास शासनास ४० टक्के कर देऊ, त्यातून शासनास महसूल मिळेल व शेतकर्‍यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असे लोखंडे यांनी निवेदनात सांगितले आहे.

तर ९० दिवसांत परवानगी न मिळाल्यास परवानगी मिळाली आहे. असे गृहीत धरुन गांजाची लागवड करणार असल्याचे लोखंडे यांनी निवेदनात नमुद केले आहे.