सकाळीच शहरातील बाजारपेठ खुलण्यास सुरुवात सायंकाळ ऐवजी सकाळीच फुलते बाजारपेठ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- कोरोनाच्या तिसरा लाटेच्या पार्श्‍वभूमीवर संध्याकाळी 4 नंतर दुकाने उघडी ठेवण्यास निर्बंध घालण्यात आले असून, सायंकाळ ऐवजी सकाळीच बाजारपेठ फुलण्यास सुरुवात झाली आहे. कापड बाजार,

मोची गल्ली येथील बहुतांश दुकाने सकाळी 8 वाजता उघडत असल्याने ग्राहक वर्ग खरेदीसाठी सकाळी 9 वाजल्यापासूनच येत आहे. सकाळी 9 वाजल्यापासून ग्राहकांची वर्दळ सुरु होत असून,

कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन दुकानदार आपला व्यवसाय करीत असल्याची माहिती मोची गल्ली व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मन्सूर शेख यांनी दिली.

रविवार (दि.27 जून) पासून जिल्हाधिकारी यांनी परिपत्रक काढून सर्व दुकानांना सकाळी 7 ते संध्याकाळी 4 वाजे पर्यंत उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे.

या नियमांचे पालन करुन सर्व व्यापारी सकाळी लवकर येऊन दुकाने उघडत आहे. लग्नसराई सुरु असून त्याची खरेदी करण्यासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच ग्राहक बाजारपेठेत दाखल होत आहे.

महिलावर्ग देखील खरेदीसाठी बाजारात येत आहे. यामुळे दुकानदार व ग्राहकांना देखील सकाळी लवकर येण्याची सवय लागत आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्व दुकानदार मास्क व सॅनीटायझरचा वापर करीत असून, संध्याकाळी चार नंतर सर्व दुकाने बंद होत आहे. तर पाच व वाजता सपुर्ण बाजारपेठेत शुकशुकाट होत आहे. पोलीस व मनपा प्रशासन बाजारपेठवर लक्ष ठेवून आहे.

अहमदनगर लाईव्ह 24